लग्नाचा बायोडाटा मोफत बनवा – Marathi Biodata Maker
लग्नाचा बायोडाटा आता मराठीत काही मिनिटांत तयार करा. हा १००% मोफत Marathi biodata maker आहे – माहिती भरा, डिझाईन निवडा आणि PDF किंवा PNG डाउनलोड करा. वॉटरमार्क नाही, लॉगिन नाही.
- १००% मोफत
- वॉटरमार्क नाही
- लॉगिन नाही
- माहिती तुमच्याच फोनवर
बायोडाटा मेकर उघडायला वेळ लागत आहे.
इंटरनेट तपासा आणि पुन्हा प्रयत्न करा. जुना ब्राउझर असल्यास Chrome अपडेट करा.
The biodata maker is taking too long to load. Check your internet and try again.
मराठी बायोडाटा ३ सोप्या पायऱ्यांमध्ये
कोणतेही ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही – हे साधन फोनच्या किंवा कॉम्प्युटरच्या ब्राउझरमध्येच चालते. फक्त या तीन पायऱ्या:
१. माहिती भरा
नाव, जन्म तारीख, शिक्षण आणि कुटुंबाची माहिती भरा – किंवा जुन्या बायोडाटाचा फोटो / WhatsApp मजकूर टाका, माहिती आपोआप भरेल.
२. डिझाईन निवडा
तुमच्याच माहितीसह सर्व डिझाईन्स पाहा आणि आवडेल ते एका टॅपवर निवडा.
३. डाउनलोड करा
PDF किंवा PNG डाउनलोड करा, किंवा थेट WhatsApp वर पाठवा.
Free Marathi Biodata Maker ची वैशिष्ट्ये
इंटरनेटवर “biodata maker marathi” असे शोधणाऱ्यांना हवे असते एक सोपे, मोफत आणि पूर्णपणे मराठीत चालणारे साधन. म्हणूनच इथे खालील सर्व सुविधा कोणत्याही शुल्काशिवाय मिळतात:
पूर्णपणे मोफत, वॉटरमार्क नाही
बायोडाटा बनवणे, सर्व डिझाईन्स वापरणे आणि PDF/PNG डाउनलोड करणे – सगळे मोफत. बायोडाटावर वॉटरमार्क येत नाही आणि खाते उघडावे लागत नाही.
रास-नक्षत्र आपोआप
जन्म तारीख व जन्म वेळ भरून एक बटण दाबा – रास, नक्षत्र, चरण, नाडी आणि गण आपोआप भरतात. ही माहिती अंदाजे असते, म्हणून ज्योतिषाकडून खात्री करून घ्यावी.
इंग्रजीत टाईप करा – मराठी होईल
मराठी कीबोर्डची गरज नाही. Rahul असे लिहून स्पेस दाबा, ते लगेच “राहुल” होते. हवे तर बोलून लिहिण्याची सोयही आहे.
जुन्या बायोडाटावरून माहिती (बीटा)
जुन्या बायोडाटाचा फोटो किंवा WhatsApp वरचा मजकूर द्या; नाव, शिक्षण, कुटुंब अशी माहिती रिकाम्या रकान्यांत आपोआप भरते. भरलेली माहिती एकदा तपासा.
श्री./सौ./चि./कु./कै. आपोआप
मुलाच्या नावापुढे चि., मुलीच्या नावापुढे कु., वडिलांपुढे श्री., आईपुढे सौ. आणि दिवंगत व्यक्तीपुढे कै. – ही संबोधने आपोआप लागतात आणि हवी तर बंद करता येतात.
माहिती तुमच्याच फोनवर
तुमची माहिती आणि फोटो तुमच्या फोनच्या ब्राउझरमध्येच राहतात; आमच्या सर्व्हरवर काहीही पाठवले जात नाही. एका फोनवर ३ बायोडाटा जतन करता येतात.
तुमची माहिती तुमच्याकडेच
बायोडाटा पूर्णपणे तुमच्या फोनच्या ब्राउझरमध्ये तयार होतो. तुम्ही भरलेली माहिती आणि फोटो आमच्या सर्व्हरवर पाठवले जात नाहीत, त्यामुळे ते आम्हालाही दिसत नाहीत.
- माहिती तुमच्याच फोनवर
- फोटो कुठेही अपलोड होत नाही
- लॉगिन नाही
माहिती कुठे जाते?
- १भरा
- २फोनवरच तयार
- ३डाउनलोड
तुमच्यासाठी योग्य बायोडाटा निवडा
लग्नाचा बायोडाटा फॉरमॅट
बायोडाटामध्ये कोणती माहिती, कोणत्या क्रमाने लिहावी – पूर्ण मराठी नमुन्यासह.
बायोडाटा टेम्पलेट्स व नमुने
तयार डिझाईन्स आणि भरलेले नमुने एकाच ठिकाणी.
मुलीचा बायोडाटा
मुलीच्या लग्नासाठी बायोडाटा कसा लिहावा – नमुना आणि टिप्स.
मुलाचा बायोडाटा
मुलाच्या लग्नासाठी शिक्षण, नोकरी आणि कुटुंबाची माहिती कशी द्यावी.
Word व PDF बायोडाटा डाउनलोड
बायोडाटा PDF मध्ये कसा मिळवावा आणि Word फाईलविषयी माहिती.
परिचय पत्र
लग्नासाठी परिचय पत्र म्हणजे काय आणि ते कसे लिहावे.
हिंदू विवाह बायोडाटा
गोत्र, देवक, कुलदैवत यांसह हिंदू विवाहासाठी बायोडाटा.
मराठा बायोडाटा
मराठा समाजातील लग्नासाठी बायोडाटाची माहिती.
ब्राह्मण बायोडाटा फॉरमॅट
गोत्र, कुलदेवता आणि पत्रिकेच्या सविस्तर माहितीसह बायोडाटा.
पुनर्विवाह बायोडाटा
दुसऱ्या लग्नासाठी बायोडाटा आदराने आणि स्पष्टपणे कसा लिहावा.
फोटोशिवाय बायोडाटा
फोटो न लावता चांगला बायोडाटा कसा बनवावा.
श्री स्वामी समर्थ बायोडाटा
“॥ श्री स्वामी समर्थ ॥” ओळीने सुरू होणारा लग्नाचा बायोडाटा.
श्री गणेश बायोडाटा
“॥ श्री गणेशाय नमः ॥” आणि गणेशाच्या इतर ओळींसह बायोडाटा.
आमचे लग्नाचे बायोडाटा डिझाईन्स
पारंपरिक, रॉयल, पैठणी, फ्लोरल, मॉडर्न अशी एकूण ८ डिझाईन्स मोफत आहेत. आवडलेल्या डिझाईनवर “हा डिझाईन वापरा” दाबा – तेच डिझाईन निवडून बायोडाटा मेकर उघडेल. डिझाईन बदलले तरी भरलेली माहिती तशीच राहते. प्रत्येक डिझाईन A4 आकारात आहे, त्यामुळे छापल्यावरही ते नीट दिसते आणि फोनवर पाहतानाही अक्षरे स्पष्ट वाचता येतात.
-
पारंपरिक
हा डिझाईन वापरा -
रॉयल
हा डिझाईन वापरा -
पैठणी
हा डिझाईन वापरा -
मॉडर्न
हा डिझाईन वापरा -
फ्लोरल
हा डिझाईन वापरा -
क्लासिक
हा डिझाईन वापरा -
साधा
हा डिझाईन वापरा -
डार्क ब्लू
हा डिझाईन वापरा
आधी नमुना पाहा, मग ठरवा
फॉर्म न भरता एक तयार बायोडाटा उघडून पाहा. हा नमुना आहे – त्यातली नावे आणि माहिती काल्पनिक आहे. तुमचा बायोडाटाही असाच, तुम्ही निवडलेल्या डिझाईनमध्ये तयार होतो.
Marriage Biodata in Marathi – बायोडाटामध्ये कोणती माहिती लिहावी?
Marriage biodata in Marathi तयार करताना सर्वात महत्त्वाचे असते ते योग्य माहिती, योग्य क्रमाने आणि थोडक्यात मांडणे. स्थळ पाहताना पहिली ओळख बायोडाटामधूनच होते, म्हणून अनेक जण “bio data for marriage in marathi” असे शोधून नेमके काय लिहावे ते पाहतात.
खाली प्रत्येक भागात काय लिहावे ते उदाहरणासह दिले आहे. सोबत आमच्या साधनाने बनवलेले तीन नमुने आहेत (नावे आणि माहिती काल्पनिक आहे).
वैयक्तिक माहिती
बायोडाटाचा पहिला भाग स्वतःबद्दल असतो. प्रत्येक रकान्याचे उदाहरण आणि छोटी टीप:
| माहिती | उदाहरण | टीप |
|---|---|---|
| नाव | चि. राहुल सुरेश पाटील | स्वतःचे, वडिलांचे नाव आणि आडनाव – पूर्ण आणि अचूक स्पेलिंगसह. |
| जन्म तारीख | १२ मार्च १९९६ | पत्रिकेत आहे तीच तारीख लिहा. |
| जन्म वेळ | सकाळी ७:४५ वा. | सकाळ की संध्याकाळ ते स्पष्ट लिहा; रास-नक्षत्रासाठी अचूक वेळ महत्त्वाची. |
| जन्म ठिकाण | कोल्हापूर | गाव किंवा शहराचे नाव पुरेसे आहे. |
| उंची | ५ फूट ८ इंच | फूट-इंचात लिहा; आमचे साधन सेंटिमीटरही आपोआप दाखवते. |
| वर्ण | गव्हाळ | गोरा, निमगोरा, गव्हाळ किंवा सावळा – हवे तरच लिहा. |
| रक्तगट | B+ | माहीत असेल तर लिहा. |
| शिक्षण | बी.ई. (सिव्हिल) | सर्वात मोठी पदवी आणि विषय; कॉलेजचे नाव ऐच्छिक. |
| नोकरी / व्यवसाय | सिव्हिल इंजिनिअर, खासगी कंपनी, पुणे | पद, कामाचे स्वरूप आणि ठिकाण. |
| उत्पन्न (ऐच्छिक) | वार्षिक ८ लाख | लिहायचे की नाही हा तुमचा निर्णय; लिहिल्यास वार्षिक आकडा द्या. |
पत्रिका माहिती
पत्रिका जुळवताना पाहिली जाणारी माहिती पत्रिकेत असेल तशीच लिहा:
- रास – जन्मावेळी चंद्र ज्या राशीत असतो ती रास (उदा. मेष, सिंह, कन्या).
- नक्षत्र – जन्मावेळी चंद्र ज्या नक्षत्रात असतो ते; एकूण २७ नक्षत्रे आहेत.
- चरण – प्रत्येक नक्षत्राचे चार भाग असतात; त्यांपैकी कोणता भाग, ते चरण.
- नाडी – आद्य, मध्य किंवा अंत्य; गुणमिलनात नाडी पाहिली जाते.
- गण – देव, मनुष्य किंवा राक्षस; हाही गुणमिलनाचा एक भाग आहे.
- गोत्र – कुळाचे मूळ ऋषी-नाव (उदा. कश्यप, भारद्वाज).
- देवक – लग्नविधीत पुजले जाणारे कुळाचे देवक (उदा. पंचपल्लव).
- कुलदैवत – कुटुंबाचे कुलदैवत आणि त्याचे ठिकाण (उदा. श्री खंडोबा, जेजुरी).
- मंगळ – पत्रिकेत मंगळ आहे की नाही; पत्रिकेत लिहिले असेल तसेच लिहा.
जन्म तारीख आणि जन्म वेळ भरल्यावर आमचे साधन रास, नक्षत्र, चरण, नाडी आणि गण आपोआप मोजून भरू शकते. मंगळ मात्र आपोआप मोजला जात नाही. आपोआप भरलेली माहिती पत्रिकेशी एकदा जुळवून पाहा.
कौटुंबिक माहिती
वडिलांचे आणि आईचे पूर्ण नाव व व्यवसाय, भाऊ-बहीण (विवाहित की अविवाहित), मामांचे नाव व गाव आणि नातेसंबंध (आडनावे) लिहा. कुटुंबाची माहिती थोडक्यात पण स्पष्ट असली की समोरच्या कुटुंबाला ओळख पटकन होते.
मराठी बायोडाटामध्ये नावापुढे आदरार्थी संबोधन लिहिण्याची पद्धत आहे: अविवाहित मुलासाठी चि. (चिरंजीव) आणि अविवाहित मुलीसाठी कु. (कुमारी); विवाहित पुरुषासाठी श्री. आणि विवाहित स्त्रीसाठी सौ. (सौभाग्यवती); हयात नसलेल्या व्यक्तीसाठी कै. (कैलासवासी). आमच्या साधनात ही संबोधने आपोआप लागतात आणि प्रत्येक नावासाठी ती बंद करण्याचा पर्यायही आहे.
संपर्क माहिती
शक्यतो आई-वडिलांचा किंवा घरातील जबाबदार व्यक्तीचा मोबाईल नंबर द्या; एक किंवा दोन नंबर पुरेसे आहेत. पत्त्यात परिसर आणि शहर लिहिले तरी चालते – पूर्ण पत्ता ओळख झाल्यावर देता येतो. बायोडाटा अनेक ग्रुपमध्ये पुढे पाठवला जातो, म्हणून आधार क्रमांक, पगाराची स्लिप किंवा इतर खासगी कागदपत्रांची माहिती त्यात टाकू नका.
अपेक्षा व माझ्याबद्दल
माझ्याबद्दल: दोन-तीन वाक्यांत स्वभाव, आवडी आणि कुटुंबाबद्दलचा दृष्टिकोन लिहा. उदाहरण: “मी शांत आणि मनमोकळ्या स्वभावाची आहे. वाचन आणि स्वयंपाकाची आवड आहे. कुटुंबाला वेळ देणे मला महत्त्वाचे वाटते.” आमच्या साधनातील लेखन-मदत तुमच्या माहितीवरून असा मसुदा तयार करून देते; तो तुम्ही हवा तसा बदलू शकता.
अपेक्षा: जोडीदाराबद्दलच्या मुख्य अपेक्षा थोडक्यात आणि आदराने लिहा; खूप मोठी यादी टाळा. उदाहरण: “सुशिक्षित, निर्व्यसनी आणि कुटुंबाला महत्त्व देणारा जोडीदार. पुणे किंवा मुंबईत नोकरी असल्यास प्राधान्य.”
बायोडाटामधील माहितीचा क्रम
सर्वसाधारणपणे क्रम असा ठेवला जातो: सुरुवातीची ओळ आणि नाव, मग वैयक्तिक माहिती, पत्रिकेची माहिती, कौटुंबिक माहिती आणि शेवटी संपर्क. आमच्या साधनात माहिती वैयक्तिक, कौटुंबिक आणि संपर्क अशा तीन भागांत आधीच मांडलेली असते (पत्रिकेची माहिती वैयक्तिक भागात येते). हवे असल्यास कोणताही रकाना वर-खाली हलवता येतो, त्याचे नाव बदलता येते, तो लपवता येतो किंवा स्वतःचा नवीन रकाना जोडता येतो.
बायोडाटाच्या सुरुवातीची ओळ
अनेक कुटुंबे बायोडाटाच्या सुरुवातीला इष्टदेवतेचे किंवा कुलदैवताचे नाव लिहितात – उदा. “॥ श्री गणेशाय नमः ॥”, “॥ श्री स्वामी समर्थ ॥” किंवा “॥ जय मल्हार ॥”. आमच्या साधनात अशा काही ओळी तयार आहेत; तुमची स्वतःची ओळ लिहिता येते किंवा ओळ पूर्णपणे काढताही येते. ओळीसोबत छोटे चिन्ह दाखवायचे की नाही, तेही तुम्ही ठरवू शकता.
फोटो कसा असावा?
बायोडाटा पाहताना सगळ्यात आधी नजर फोटोकडे जाते. चेहरा स्पष्ट दिसेल असा, चांगल्या उजेडातील आणि साध्या पार्श्वभूमीचा अलीकडचा फोटो निवडा. फार जुना फोटो, ग्रुप फोटो किंवा जास्त फिल्टर लावलेला फोटो टाळा. फोनने काढलेला फोटोही चालतो – आमच्या साधनात फोटो कापणे, झूम करणे आणि फिरवणे यांची सोय आहे, तसेच “फोटो सुधारा” बटणाने प्रकाश आपोआप सुधारता येतो. फोटो लावायचा नसेल तर तो रकाना रिकामा ठेवा; बायोडाटामध्ये फोटोची रिकामी जागा दिसत नाही.
मुलाचा आणि मुलीचा बायोडाटा – काय वेगळे?
दोघांच्याही बायोडाटामध्ये मुख्य माहिती सारखीच असते; फरक थोडा मांडणीत असतो. मुलाच्या बायोडाटामध्ये नोकरी किंवा व्यवसाय आणि कामाचे ठिकाण स्पष्ट लिहिणे महत्त्वाचे मानले जाते. मुलीच्या बायोडाटामध्ये शिक्षण, नोकरी (असल्यास) आणि लग्नानंतरचे शहर किंवा नोकरीबद्दलची अपेक्षा थोडक्यात लिहिणे उपयोगी ठरते. नावापुढचे संबोधनही वेगळे असते – मुलासाठी “चि.” आणि मुलीसाठी “कु.”. आमच्या साधनात सुरुवातीला “वधू (मुलगी)” किंवा “वर (मुलगा)” निवडले की ही संबोधने आपोआप योग्य लागतात.
लग्नाचा बायोडाटा म्हणजे काय?
लग्नाचा बायोडाटा म्हणजे लग्न जुळवताना मुलाची किंवा मुलीची ओळख करून देणारे एक-दोन पानांचे परिचय पत्र. मराठी कुटुंबांमध्ये स्थळ पाहताना सर्वात आधी बायोडाटाच पाठवला जातो. त्यात नाव, जन्म तारीख, शिक्षण, नोकरी, पत्रिकेची माहिती आणि कुटुंबाची ओळख असते.
आजकाल नातेवाईक, विवाह मंडळे आणि समाजाचे गट बायोडाटा मुख्यतः WhatsApp वरून पुढे पाठवतात, तर अनेक घरांत तो छापून फोटोसोबत दिला जातो. म्हणून बायोडाटा स्वच्छ, अचूक आणि वाचायला सोपा असावा. इंटरनेटवर अनेक जण “lagna biodata marathi” असे शोधतात ते याच कारणासाठी – चांगला, मराठीतला बायोडाटा पहिली छाप चांगली पाडतो.
चांगल्या बायोडाटासाठी ८ महत्त्वाच्या टिप्स
- शक्यतो एकच पान. महत्त्वाची माहिती एका पानात मावेल असे पाहा; लागू नसलेले रकाने लपवा. माहिती जास्त असल्यास आमचे साधन अक्षरे थोडी लहान करते आणि गरज पडल्यास दुसरे पान जोडते.
- स्वच्छ, अलीकडचा फोटो. चेहरा स्पष्ट दिसेल असा, साध्या पार्श्वभूमीचा आणि अलीकडचा फोटो लावा.
- नावांचे अचूक स्पेलिंग. स्वतःचे, आई-वडिलांचे आणि नातेवाईकांचे नाव नीट तपासा – चुकीचे नाव चांगली छाप पाडत नाही.
- फक्त खरी माहिती. शिक्षण, नोकरी, उत्पन्न किंवा उंची वाढवून लिहू नका; खोटी माहिती पुढे अडचणीची ठरते.
- पत्रिकेशी जुळणारी माहिती. जन्म तारीख, जन्म वेळ, रास आणि नक्षत्र पत्रिकेत आहे तसेच लिहा.
- आदरार्थी संबोधने. चि., कु., श्री., सौ., कै. योग्य ठिकाणी वापरा.
- पालकांचा संपर्क क्रमांक. आई-वडिलांचा किंवा घरातील जबाबदार व्यक्तीचा नंबर द्या.
- पाठवण्यापूर्वी तपासा. बायोडाटा एकदा पूर्ण वाचून पाहा; छापण्यासाठी PDF आणि WhatsApp साठी PNG पाठवा.
बायोडाटा PNG मध्ये पाठवावा की PDF मध्ये?
PNG म्हणजे फोटोसारखी फाईल. ती WhatsApp वर पाठवायला सोपी असते आणि फोनवर उघडताच लगेच दिसते, त्यामुळे नातेवाईकांना पटकन बायोडाटा दाखवण्यासाठी PNG उत्तम. PDF फाईल A4 आकारात असते आणि छापल्यावरही अक्षरे सुबक दिसतात; म्हणून प्रिंट काढण्यासाठी आणि विवाह मंडळात देण्यासाठी PDF योग्य.
आमच्या साधनात दोन्ही फाईल्स मोफत डाउनलोड करता येतात – Word व PDF बायोडाटा डाउनलोड करताना हा फरक लक्षात ठेवा.
हे मोफत कसे?
लग्नाचा बायोडाटा हे मोफत साधन आहे. बायोडाटा बनवणे, पूर्ण पाहणे आणि PDF किंवा फोटो डाउनलोड करणे – कशासाठीही पैसे लागत नाहीत.
- साइटचा खर्च पुढे लेखांच्या पानांवर जाहिराती दाखवून भागवला जाऊ शकतो. बायोडाटा बनवण्याच्या साधनात जाहिराती नसतील.
- पुढे काही ऐच्छिक जास्तीच्या सुविधा (उदा. AI मदत) येऊ शकतात; त्या वापरायच्या की नाही, हे पूर्णपणे तुमच्या हातात असेल.
- बायोडाटा डाउनलोड करण्यासाठी आम्ही कधीही पैसे घेणार नाही, वॉटरमार्क लावणार नाही आणि लॉगिन मागणार नाही.
लवकरच येणाऱ्या सुविधा
हे साधन सतत सुधारले जात आहे. खालील सुविधांवर काम सुरू आहे; त्या तयार झाल्या की बायोडाटा मेकरमध्येच दिसतील.
- लवकरच
स्मार्ट AI मदत
भरलेली माहिती तपासून ती सुंदर आणि नेमक्या शब्दांत मांडण्यासाठी मदत.
- लवकरच
मंगळ आणि लग्न आपोआप
जन्म तारीख, वेळ आणि ठिकाणावरून मंगळ आणि लग्न रास मोजणे.
- लवकरच
आणखी डिझाईन्स
नवीन पारंपरिक आणि आधुनिक डिझाईन्स.
- लवकरच
इंग्रजी बायोडाटा
तीच माहिती वापरून इंग्रजी भाषेतील बायोडाटा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
बायोडाटा बनवताना पालकांना आणि मुला-मुलींना पडणारे नेहमीचे प्रश्न आणि त्यांची सरळ उत्तरे. तुमचा प्रश्न इथे नसेल तर संपर्क पानावरून आम्हाला विचारा.
हा मराठी बायोडाटा मेकर खरंच मोफत आहे का?
हो, हा बायोडाटा मेकर पूर्णपणे मोफत आहे. सर्व डिझाईन्स, PDF आणि PNG डाउनलोड मोफत आहेत – वॉटरमार्क नाही आणि लॉगिनही लागत नाही.
बायोडाटा बनवायला किती वेळ लागतो?
साधारण काही मिनिटे लागतात. माहिती हाताशी असेल तर काम आणखी लवकर होते, आणि जुना बायोडाटा असेल तर त्याचा फोटो किंवा मजकूर देऊन बरीच माहिती आपोआप भरता येते.
माझी माहिती आणि फोटो सुरक्षित आहेत का?
हो. तुम्ही भरलेली माहिती आणि फोटो फक्त तुमच्या फोनच्या किंवा कॉम्प्युटरच्या ब्राउझरमध्ये साठवले जातात. आमच्या सर्व्हरवर काहीही पाठवले जात नाही.
माझा/मुलीचा फोटो कोणाला दिसतो का?
नाही, तुम्ही पाठवल्याशिवाय कोणालाही नाही. तुम्ही निवडलेला फोटो फक्त तुमच्या फोनच्या ब्राउझरमध्येच राहतो – तो आमच्या सर्व्हरवर किंवा इतर कुठेही अपलोड होत नाही, त्यामुळे आम्हालाही तो दिसत नाही. बायोडाटाची PDF किंवा फोटो-फाईल तुम्ही ज्यांना पाठवता, फक्त त्यांनाच तो फोटो दिसतो. दुसऱ्याच्या फोनवर बायोडाटा बनवला असेल तर काम झाल्यावर तो मेकरमधून काढून टाका.
मराठी कीबोर्ड नसेल तर मराठीत कसे लिहायचे?
इंग्रजी अक्षरांत टाईप करा – उदा. Rahul लिहून स्पेस दाबताच ते "राहुल" होते. प्रत्येक रकान्यातील अ/A बटणाने ही सोय बंद-चालू करता येते. काही ब्राउझरमध्ये माइक दाबून बोलूनही लिहिता येते.
रास, नक्षत्र माहीत नसेल तर काय करावे?
जन्म तारीख आणि जन्म वेळ भरा आणि "रास, नक्षत्र आपोआप भरा" हे बटण दाबा. रास, नक्षत्र, चरण, नाडी, गण आणि योनी अंदाजे भरले जातात; पत्रिकेशी किंवा ज्योतिषाकडून त्यांची खात्री करा.
जुन्या बायोडाटावरून माहिती भरता येते का?
हो, ही सोय सध्या बीटा आहे. "फोटोवरून भरा" मध्ये जुन्या बायोडाटाचा फोटो निवडा किंवा "WhatsApp मजकूर पेस्ट करा" मध्ये मजकूर टाका – फक्त रिकामे रकाने भरले जातात. भरलेली माहिती एकदा नक्की तपासा.
बायोडाटा PDF मध्ये घ्यावा की PNG मध्ये?
WhatsApp वर पाठवण्यासाठी PNG (फोटो) सोयीचा आहे, तर छापण्यासाठी A4 आकाराचा PDF योग्य आहे. दोन्ही मोफत डाउनलोड करता येतात.
फोटोशिवाय बायोडाटा बनवता येतो का?
हो. फोटो ऐच्छिक आहे; फोटो न टाकल्यास बायोडाटामध्ये फोटोची रिकामी जागा दिसत नाही. फोटोशिवाय बायोडाटा नीटनेटका कसा करावा, हे फोटोशिवाय बायोडाटा कसा बनवावा या पानावर सविस्तर दिले आहे.
Word फाईलमध्ये बायोडाटा मिळेल का?
हो. Word मध्ये भरता येणाऱ्या तीन मोफत फाईल्स (पारंपरिक, साधा, आधुनिक) Word व PDF बायोडाटा डाउनलोड या पानावर आहेत. येथे बनवलेला बायोडाटा PDF आणि PNG स्वरूपात डाउनलोड होतो.
बनवलेला बायोडाटा नंतर बदलता येतो का?
हो, त्याच फोनवर त्याच ब्राउझरमध्ये पान पुन्हा उघडल्यावर तुमची माहिती तशीच दिसते; बदल करून पुन्हा डाउनलोड करा. दुसऱ्या फोनवर किंवा ब्राउझरचा डेटा पुसल्यावर ती दिसणार नाही, म्हणून तयार PDF जपून ठेवा.
बायोडाटा WhatsApp वर कसा पाठवायचा?
फोनवर "WhatsApp वर पाठवा" बटण दाबा आणि WhatsApp निवडा – बायोडाटा थेट जोडला जातो. कॉम्प्युटरवर बायोडाटा डाउनलोड करून WhatsApp Web मध्ये जोडा.
एकाच फोनवर दोन मुलांचे बायोडाटा बनवता येतात का?
हो. एकाच फोनवर ३ वेगवेगळे बायोडाटा (प्रोफाईल) ठेवता येतात. "नवीन प्रोफाईल" बटणाने दुसरा बायोडाटा सुरू करा.
ताजे मार्गदर्शक लेख
२७ नक्षत्रे – रास, गण, नाडी आणि योनी तक्ता
२७ नक्षत्रांचा मराठी तक्ता: प्रत्येक नक्षत्राचे चरण कोणत्या राशीत, गण, नाडी व योनी. फक्त माहितीसाठी – पत्रिकेसाठी ज्योतिषाकडून खात्री करा.
बायोडाटा म्हणजे काय? लग्नाच्या बायोडाटाचा अर्थ
बायोडाटा म्हणजे काय, लग्नाचा बायोडाटा आणि नोकरीचा रेझ्युमे यात फरक काय, आणि मराठीत त्याला कोणते शब्द वापरतात – सोप्या भाषेत अर्थ.
बायोडाटामध्ये “माझ्याबद्दल” काय लिहावे? ३० उदाहरणे
बायोडाटामध्ये "माझ्याबद्दल" कसे लिहावे? स्वभाव, आवडी, कुटुंब आणि करिअरबद्दल २–४ ओळी – मुलगा व मुलगी दोघांसाठी ३० मूळ मराठी उदाहरणे.
लग्नाचा बायोडाटा कसा बनवायचा? ७ सोप्या पायऱ्या
लग्नाचा बायोडाटा मराठीत कसा बनवायचा? माहिती गोळा करण्यापासून तपासणी, डिझाईन, PDF आणि पाठवण्यापर्यंत ७ सोप्या पायऱ्या – फोनवरही करता येतील.
वधू-वर मेळाव्याला जाताना काय घेऊन जावे? तयारी व टिप्स
वधू-वर मेळाव्याची तयारी: नोंदणी, पुस्तिकेतील माहिती, सोबत न्यायच्या वस्तूंची यादी, मंचावर परिचय कसा द्यावा आणि मेळाव्यानंतर पाठपुरावा कसा करावा.
उंची सेमी ते फूट-इंच तक्ता – बायोडाटासाठी
उंची फूट-इंच ते सेमी आणि सेमी ते फूट-इंच असा गणित करून तयार केलेला तक्ता (१ इंच = २.५४ सेमी), उंची अचूक कशी मोजावी आणि…

Shubham Saindaneपुणे
आई-वडिलांनाही फोनवर काही मिनिटांत, आपल्या भाषेत आणि एकही पैसा न देता नीटनेटका बायोडाटा बनवता यावा – आणि खासगी माहिती कोणालाही द्यावी लागू नये – म्हणून हे साधन बनवले.
पुण्यात बनवलेले · मराठी कुटुंबांसाठी
आमच्याबद्दल अधिकआत्ताच तुमचा लग्नाचा बायोडाटा मोफत बनवा
हा Marathi biodata maker पूर्णपणे मोफत आहे – माहिती भरा, डिझाईन निवडा आणि काही मिनिटांत सुंदर मराठी बायोडाटा डाउनलोड करा.
लग्नाचा बायोडाटा हे मराठी कुटुंबांसाठी बनवलेले मोफत बायोडाटा साधन आहे. ते पुण्यातील Shubham Saindane चालवतात. आमच्याबद्दल अधिक वाचा
शेवटचे अद्यतन: